मनातलं

एखादा विषय विचारात रुंजी घालू लागला की जो पर्यन्त तो कागदावर उतरवित नाही तो पर्यन्त चैन पडत नाही. कधी कधी अगदी नवा विषय , नवं तंत्रज्ञान, नवी कल्पना डोक्यात येते तर कधी चालू घडा मोडींवर भाष्य करावं , आपल्याकडील ज्ञान शेअर असा विचार येतो. अशा वेळी पूर्वी अगदी वही पेन घेऊन ते सारे विचार समर्पक , योग्य, सोप्या भाषेत मांडले की आनंद मिळायचा, तोच आनंद आता संगणकावर हे सारं सेव्ह केलं की मिळतो ही गोष्ट स्वाभाविक आहे. इतरां प्रमाणेच सुरुवात फक्त स्वत:च्या आनंदासाठी लिहिणे येथूनच झाली पण जस जसे नवे तंत्रज्ञान शिकू लागलो तस तसे याचे ज्ञान सर्व सामान्यां पर्यन्त पोहोचू शकेल का ? तेही मराठीत त्यांना समजेल अशा भाषेत यावर विचार केला आणि तसे लिहिण्यास सुरुवात केली. कधी एखाद्या तंत्रज्ञानाच्या माहिती साठी विशेष मागणी यायची तर कधी मीच नव्या तंत्रज्ञानाच्या सागरातून निवडक मोती शोधायचो आणि त्याची विशेषत: विषद करायचो. संगणकावर युनिकोड सुरू झाल्यानंतर स्वत:चा ब्लॉग असावा असे विचार येऊ लागले, तसे पाहिले तर युनिकोड मध्ये भारताचा सहभाग हा २००० साली झाला, पण त्याचा प्...